मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकाने भरलेल्या अवस्थेतील आढळलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु झाला आहे. संपूर्ण घटनेचा तपास क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांचेकडे होता. त्यामुळे विरोधकांनी सचिन वाझे यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ऊपस्थित केले आहे. तसेच शिवसेनेचे आणि वाझे यांचे काही वैयक्तिक संबंद्ध आहेत का? असा सवाल मनसेने विचारला आहे. गृहमंत्र्यांनी मात्र सचिन वाझेंच्या सनर्थनार्थ भूमिका घेत विरोधकांना सुनावले आहे.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या घटनेकडे लागले आहे. अंबानी यांचेकडून खंडणि वसुल करण्याचा हा नविन प्रकार आहे की खरोखरच काही दहशतवादी कट आहे असा संशय या घटनेत घेण्यात येत आहे. यावरुनच देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी सचिन वाझेंवर या घटनेचा आधार घेतच टीका केली. “वाझे काळा की गोरा याचा आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांचे कार्य संशयास्पद आहे.” आसे फडणवीस म्हणाले. तर वाझेला आम्ही घाबरत नाही असे आशिष शेलार म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र यांस प्रत्युत्तर दिले आहे.
“सचिन वाझे यांनी तुमच्या अर्णवला पकडला, त्यामुळेच तुम्ही त्यांच्यावर जळताय ना” असे अनिल देशमुख यांनी संबंद्धित प्रकरणावर सभागृहात निवेदन सादर करतांना हे वक्तव्य केले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखच्या या विधानाच निषेध केला आहे.
महाराष्ट्र सरकार मनसुख हिरेन यांची आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र ही हत्या आहे. मनसुख यांचा मृतदेह आढळला तेव्हा त्यांचेबहात बांधलेले होते. हात बांधून कुणी आत्महत्या करते का? असे सवाल करत संपूर्ण घटनेचा तपास एनआयएकडे देण्यात येण्याची मागणी भाजपने केली आहे. एटीएस या घटनेचा पुढील तपास करत आहे.