पुणे जिल्ह्यात होळी व धूलिवंदन सण एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील जागा येथे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्यास मनाई करणे आवश्यक झाले आहे.
येत्या २८ मार्च रोजी होळी असून, २९ मार्च रोजी धूलिवंदन आणि २ एप्रिलला रंगपंचमी आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हे उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे पालन करुन नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.
जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सभागृहे आणि सर्व गृहनिर्माण सोसायट्यांमधील मोकळ्या जागांमध्ये होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.