राष्ट्रवादीवर पुन्हा संकट, नवाब मलिक यांच्या जावयाला NCB चे समन्स

36

बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवुडमधले अनेक ड्रग्ज कनेक्शन्स उघडे पडले आहेत. यामध्ये बॉलीवूडसोबत राजकीय लोकांची पण नावे समोर आली आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने समन्स बजावले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या नेतेमंडळींचे आता या मुद्द्यावरून चर्चांना उधाण आले आहे.

नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावल्याचे सांगितले जात आहे.

एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात शनिवारी एनसीबीने करण सजनानी नावाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही जप्त करण्यात आला होता. त्यात समीर खान यांचही नावं समोर आले आहे. त्यामुळे मंगळवारी 12 जानेवारी रात्री आठच्या सुमारास एनसीबीच्या एक टीमने वांद्र्यात जाऊन समीर खान यांना समन देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार समीर खान आज 13 जानेवारी सकाळी साडेआठ वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात हजर झाले. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.