देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते महाराष्ट्रावर टीका करतात त्यांच्या टीकेला आता काही अर्थ उरला नाही कारण पंतप्रधानांनी स्वतः महाराष्ट्राचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकारने खरंच चांगली कामगिरी केली आहे. आपण उत्तरेकडील राज्यांशी तुलना केली तर आपल्याला ते दिसेल. असे सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
केंद्र सरकारकडून ज्या प्रमाणात लस येत आहे त्या प्रमाणात जिल्ह्यात लसीकरण केले जात आहे. शासन दुसऱ्या डोसला प्राधान्य देत आहे आणि त्याचप्रमाणे प्रशासन नियोजन करत आहे. १३ कोटी जनतेला लस देणे ही मोठी जबाबदारी आहे, आम्ही सर्वच जास्तीत जास्त लस मिळावी याचा प्रयत्न करत आहोत. असे आश्वासन सुद्धा पाटील यांनी दिले आहे.
तिसऱ्या लाटेबाबतही आम्ही नियोजन करत आहोत, मात्र सध्या प्राधान्य दुसरी लाट थोपवणे हे आहे. प्रशासन संपूर्ण प्रयत्न करत आहेत. आम्ही नक्कीच यश मिळवू. नागरिकांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. आपण ही शृंखला तोडण्यासाठी नक्की यशस्वी होऊ. असेही पाटील म्हणाले.