राज्यातील सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करतात. असा हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असे कान सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे टोचले आहेत.
राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. सरकारमधील मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करत असतात. कोणत्याही सरकारमध्ये पॉलिसी डिसीजन घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. याची आठवण फडणवीस यांनी सरकारला करून दिली.
राज्य सरकारमध्ये एकाच विषयावर पाच पाच मंत्री घोषणा करत असतात. आणि त्यानंतर मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचं सांगतात. हे श्रेयासाठी सुरू आहे. मुख्यमंत्री मंत्र्यांना शिस्त लावावी. असेही फडणवीस म्हणाले.