राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मत व्यक्त करत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांना हात घातला. यादरम्यान शेतकरी आंदोलनावर त्यांनी अप्रत्यक्षरित्या निशाना साधला. “आजकाल एक नविन जमात उदयास आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी” असे मोदी यावेळी म्हणाले. मोदींच्या या विधानामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. विरोधी पक्षातील नेते मोदींवर चांगलेच बरसले. शिवसेना नेते संजय राऊत यांनीसुद्धा यावरुन मोदींवर निशाना साधला तर कॉंग्रेसचे नेते शशी थरुर यांनी कॉंग्रेसच्या काळात आंदोलन करणार्यांचे नावाचे ट्वीट करत हे कोण होते? असा सवाल केला. आता राहुल गांधी यांनीसुद्धा ट्वीट करत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी अत्यंत कमी शब्दात परंतू मोठा बोध देणारे ट्वीट केले आहे. राहुल गांधी यांनी “cornyजीवी, वो देश बेच रहा है” corny चा अर्थ मैत्री होतो. त्यामुळे आपल्या मित्रांसाठी मोदी देश विकतायत असा बोध या ट्वीटमधून करण्यात आला आहे. तसेच मागील काही काळातील सरकारतर्फे खाजगीकरणांस दिल्या गेलेल्या प्रोत्सहनावरसुद्धा त्यांनी बोट ठेवले आहे.
राज्यसभेत नरेंद्र मोदी यांनी “आंदोलनजीवी जमात नव्याने जन्मास आली आहे जी कुठेही आंदोलन असले की बरोबर पोहचते” असा ऊल्लेख केला. यावरुन नरेंद्र मोदींना टीकेचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी मोदींच्या “आंदोलनजीवी” या शब्दावरुन शेतकर्यांचा अपमान झाला असल्याचे म्हटले, तर काहींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आंदोलन केलेल्या महापुरुषांचे नाव ट्वीट करत पंतप्रधानांना सवाल केला आहे.
राहुल गांधी यांच्या टीकेनंतर अनेकांनी cornyजीवी असा हॅशटॅग ट्वीटरवर चालवत पंतप्रधानांवर टीका केली. अनेक ट्वीटर वापरकर्त्यांनी तर केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर कशाप्रकारे अदानी आणि अंबानी यांना फायदाच होतो आहे याचा तपशील देत cornyजीवी हॅशटॅग चालवत टीका केली आहे.