मध्यप्रदेश मध्ये विषारी दारू पिऊन मृत्यू झालेच्या घटनेनंतर शिवराज सिंह सरकारवर काँग्रेसकडून निशाणा साधला जात आहे.माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी तर शिवराज सिंह चौहान यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये विषारी दारु प्यायल्याने 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. मरणाऱ्यांमध्ये दोन वेग-वेगळ्या गावातील लोकांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमावली पोलिस स्टेशन भागात पहावली गावात 3 आणि बागचीनी भागात मानपूर गावात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात आणखी दोघांची भर पडली आहे. विषारी दारू पिल्याने हे मृत्यू झाले आहेत.
मुख्यमंत्री ज्या बाता मारत आहेत, त्या दिखाऊ आहेत. तर चंबलचे आयजी दारू पिल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगत आहेत.दारू माफियांचा कहर सुरुच आहे. उज्जैनमध्ये 16 लोकांचा जीव घेतल्यानंतर आता मुरैनामध्ये दारू माफियांनी पुन्हा एकदा 10 लोकांचा जीव घेतलाय. शिवराजजी, हे दारू माफिया कधीपर्यंत याचप्रकारे लोकांचा जीव घेत राहणार आहेत? सरकारने आजारी लोकांना तातडीने उपचार द्यावेत तसेच मृतांच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करावी.असे कमलनाथ यांनी ट्विट करत म्हटले आहे .