काश्मिरची मुलगी साताऱ्याच्या पाटलांची सून; कलम ३७० रद्दमूळे प्रेमकहाणी लग्नात रूपांतरित

35

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्याचा फायदा सातारच्या अजित पाटील यांना झाला आहे. साताऱ्याच्या कराडचे अजित पाटील चक्क काश्मीरचे जावई झाले आहेत. भारतीय सैन्य दलात असलेल्या अजित  पाटील यांनी काश्मीरच्या सुमन देवी यांच्या सोबत लग्नगाठ बांधली आहे.  लग्नासाठी मोठा अडथळा ठरू शकत असलेल्या कलम ३७० रद्द झाल्याने अजित पाटील आणि काश्मिरच्या सुमन देवी यांची प्रेमकहाणी लग्नात रूपांतरित झाली आहे.

कलम ३७० यामुळे अजित आणि सुमन देवी काही महिने निराश होते. मात्र कलम हटवलं आणि अजितने लग्नाचा निर्णय घेतला. अजित यांचा विवाह 27 नोव्हेंबर 2020 रोजी मोजक्या कराडकर नातेवाईकांच्या उपस्थितीत जम्मू काश्मीरमधील पार पडला आहे. नंतर कराडमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने काश्मिरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

असं जुळलेलं !

अजित पाटील हे कराड तालुक्यातील उंडाळे गावचे. भारतीय सैन्य दलात सैनिकी शिक्षणाचे तो प्रशिक्षण देतात. सध्या तो झांसी येथे कर्तव्यावर आहेत. काश्मीरच्या सहकारी मित्राकडे पाहुणी म्हणून आलेली जम्मू कश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यात राहणाऱ्या सुमन देवी भगत यांच्याशी अजित पाटील यांची भेट झाली. पहिल्या भेटीतच मैत्री आणि प्रेम झालं. आणि पुढे लग्नाचा निर्णय झाला.

असं फुललं प्रेम !

अजित पाटील मार्च 2020 मध्ये सुमन देवी यांच्या नातेवाईकासोबत 10 दिवसाच्या सुट्टीवर जम्मू काश्मीरला गेले. कोरोनामुळे अचानक लॉकडाऊन जाहीर झाला. आणि तब्बल तीन महिने सुमन देवीच्या घरी अजित पाटील यांना राहावं लागलं. या तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचं प्रेम फुललं. सुमन देवी यांच्या कुटुंबीयांना अजित पाटील आवडले आणि कुटुंबाच्या संमतीने दोघांची लग्नगाठ पक्की झाली.