दौंड-पुणे ‘मेमु’ धावणार गुरुवारपासून

7

नव्याने सुरू होत असलेली मेमू ही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्यांसाठीच सुरू होत आहे. असे असले तरी आगामी काळात सर्वच प्रवाशांना या गाडीने प्रवास करता यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. 

दौंड- पुणे मार्गावर येत्या गुरूवार (ता. ८) पासून मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (मेमू) रेल्वेगाडी धावणार आहे. या गाडीतून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच वाहतूक होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.

ही गाडी पुण्यावरून दौंडला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी सुटेल. तर दौंडला सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी पोचेल. सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी दौंडला रात्री ८ वाजून ४३ मिनिटांनी पोचेल. 

ही बाब लक्षात घेऊन रेल्वेकडे तसा पाठपुरावा करण्यात येईल. त्यालाही अपेक्षित यश येईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. या गाडीसाठी सुळे यांनी रेल्वे मंत्रालय, रेल्वेचे पुण्यातील विभागीय कार्यालय, प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला.