राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले देवेंद्र फडणवीस कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. मागच्या अनेक महिन्यांपासून व्हाट्सएप काही तरी नवनवीन फिचर घेऊन येत आहे आता त्यांनी व्हाट्सएप चॅनेलचं नवीन फिचर आणलं आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पुढाकार.
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्रजी अश्या काही मोजक्या राजनेत्यांपैकी एक आहेत ज्यांचे भाजपात मोदीजींनंतर स्वत:चे व्हेरिफाईड व्हॉट्स एप चॅनल आहे. राष्ट्रीय पक्षाचे सर्व्हेसर्वा असल्याने राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचेही व्हॉट्सएप चॅनल आहेत.
महाराष्ट्रातही CMO च्या नावाने व्हॉट्स एप चॅनल आहेत. काही पक्षांच्या नावानेही व्हॉट्स एप चॅनल आहेत पण वैयक्तिक आणि व्हेरिफाईड चॅनल असलेले देवेंद्रजी कदाचित महाराष्ट्रातील एकमेव नेते असावेत. टेक्नोसेव्हीपणात देवेंद्रजी नेहमीच जागरूक असतात हे त्याचेच एक उदाहरण आहे. अगदी कमी वेळातच त्यांचे हजारो फॉलोवर्स झाले आहेत.
राज्यातील इतर नेत्यांचे चॅनेल अजून आले नाहीत किंवा अजून व्हायरल झाले नसावेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे अजून चॅनेल यायचे बाकि असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला व्हाट्सएप चॅनेल.
देवेंद्र फडणवीस यांचं व्हाट्सएप चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करू शकता