धर्माबाद :- येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटविणारी, भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका, आजीवन आपल्या पतीचे सामाजिक कार्य आपल्या खांद्यावर वाहून नेणारी, साहित्यातील बावनकशी रत्न क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नासा येवतीकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.
त्यानंतर शाळेतील इयत्ता दुसऱ्या वर्गातील तेजस संघरत्न वाघमारे, सहाव्या वर्गातील सुमय्या इब्राहिम शेख, तेजस्विनी संघरत्न वाघमारे आणि सातव्या वर्गातील संकेत शेषेराव खंडेलोटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी निबंध स्पर्धा ही घेण्यात आली. त्यात तेजस्विनी संघरत्न वाघमारे हिला प्रथम पारितोषिक म्हणून शाळेकडून पेन आणि वही देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक नासा येवतीकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती देत यावर्षीपासून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याची माहिती दिली. याप्रसंगी महिला शिक्षिका सौ. चंदा मॅडम, सौ. मनीषा जोशी आणि श्रीमती एस. टी. बेहरे यांचा शाळेकडून पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. उपक्रमशील शिक्षक माधव हिमगिरे आणि एजाज अहमद सय्यद यांच्यासह शिक्षकमित्र छाया शंकरराव वाघमारे यांचीही उपस्थिती होती.