धनंजय कुलकर्णी यांनी अॅड्. उदय वारूंजीकर यांच्यामार्फत राज्य मंडळासह केंद्रीय आणि अन्य शिक्षण मंडळांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली.
सरकारने परीक्षा रद्द करून शिक्षणाची थट्टा चालवली असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने सरकारला दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न विचारला.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केले असून दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सिंधुदूर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.