रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ.अशोक बोल्डे यांची सोलापूरला विनंती बदली होऊन दोन महिने झाले. तरीही त्यांनी शल्यचिकित्सक शासकीय निवासस्थान सोडले नाही. शल्यचिकित्सक डॉ.बोल्डे असतानाच त्यांचा पदभार डॉ.संघमित्र फुले यांच्याकडे देण्यात आला. रुग्णालय प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्यांनी बंगल्याची किल्ली न दिल्याने नवीन शल्यचिकित्सक डॉ.संघमित्र फुले यांच्यासमोर राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘शल्यचिकित्सक म्हणून माझी रीतसर बदली झाली. तर बोल्डे यांची विनंती बदली.त्यामुळे त्यांनी जाण्यापूर्वी निवस्थानची किल्ली सामान्य प्रशासनाकडे जमा करण्याची जबाबदारी होती. मी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. लवकरच त्यावर निर्णय घेऊन निवस्थान ताब्यात मिळेल असे डॉ.संघमित्र फुले यांनी स्पष्ट केले आहे.
बोल्डे यांची बदली सोलापूरला झाल्यानंतर ५ ऑक्टोबरला त्यांना कार्यमुक्त केले. मात्र २ महिने झाले तरी अद्याप त्यांनी शासकीय निवस्थान सोडलेले नाही. निवस्थानची किल्ली त्यांच्याकडे असल्यामुळे विद्यमान शल्यचिकित्साकांना बंगल्यापासून वंचित राहावे लागले आहे. निवस्थानची किल्ली न मिळाल्यास कुलूप तोडण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते.