एमपीएससी पुढे ढकलण्याचा निर्णय निषेधार्ह – अभाविप

17

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्या सेवा पूर्वपरिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कोरोना्े कारण देत राज्य सरकारकडून त्यांना हे पत्र पाठवण्यात आले आणि त्यानंतर सदरचा निर्णय झाला. सलग पाचव्यांदा परिक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातवरण पसरले. प्रसंगी महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुख्य चौकात जमाव करत विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा धिक्कार केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेसुद्धा या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ऊभे राहत या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० सलग पाचव्यांदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांच्या भवितव्याशी खेळणारा आहे. या निर्णयामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी मानसिक तसेच आर्थिकदृष्ट्या देखील हतबल झाला आहे.
राज्यामध्ये यापूर्वी देखील विविध परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु कोविडचे कारण देत महाराष्ट्र शासन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सामान्य कुटुंबातील उमेदवारांवर अन्याय करीत आहे.असे अभाविपने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कोविडच्या काळात राज्याची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र शासन पूर्णतः अपयशी ठरले आहे आणि याचाच परिणाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांना भोगावा लागत आहे असे मत अभाविपचे विदर्भ प्रांत मंत्री रवि दांडगे यांनी यावेळी मांडले.

शासनाने आपल्या या दुर्दैवी निर्णयाचा पुनर्विचार करावा व कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. जे विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह असतील अशा सर्व विद्यार्थ्यांची अधिकची परीक्षा नंतर घेण्यात यावी अशी देखील मागणी रवी दांडगे यांनी जाहीर पत्रकाद्वारे केली.