गुरुमंदिर संस्थानच्य‍ावतीने राममंदिरनिर्मीतीस निधी समर्पित

55




वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, गुरुमंदिर संस्थान यांच्यावतीने अयोध्या येथे निर्मीती करण्यात येत असणार्‍या राममंदिरास निधी समर्पित करण्यात अला. यावेळी गुरुमंदिर संस्थानतर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश श्री. रामजन्मभूमि निधी समर्पन समिती कारंजा यांचेकडे सुपुर्द करण्यात आला.

अयोध्या येथील वादग्रस्त प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर त्याठिकाणी भव्य राममंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. गेल्या ५ अॉगस्टला पंतप्रधनान मोदी यांच्याहस्ते शिलान्यासाचे ऊद्घाटन झाले होते. भारताच्या प्रत्येक नागरिकाचे या मंदिरनिर्मीतीत योगदान असावे या हेतून श्री. राममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राममंदिर निधी समर्पन अभियान राबविण्यात येत आहे. १५ जानेवारी ते १५ फेबृवारी असा या अभियानाचा कालखंड आहे.

देशभरातील अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संस्थानांच्यावतीने निधी समर्पित करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमिवर गुरुमंदिर संस्थ‍ानच्यावतीनेदेखील निधी समर्पित करण्यात आला. यावेळी भाजप शहर अध्यक्ष ललीत चांडक, ऊमेश माहितकर, शशी वेरुळकर, अमोल गढवाले व भाजप कार्यकर्ते तसेच राममंदिर निधी समर्पन समितीचे डॉ. विवेक घुडे, सुमितशास्त्री बोंडे, सविज जगताप, रघु वानखडे व संस्थानचे विश्वस्त मंडळ ऊपस्थित होते.