कोरोनाच्या काळात संसर्ग होऊ नये यासाठी मार्च महिन्यात चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. या कारणाने अनेक चित्रपटांची रिलीज तारीख बदलण्यात आली होती. काही काळानंतर अनलॉकमध्ये चित्रपटगृहे काही प्रमाणात करण्यात आली होती.
बिग बजेटच्या चित्रपटांना यामुळे जास्त प्रमाणात फटका बसला आहे. 1 फेब्रुवारीपासून चित्रपटगृहे 50 टक्क्यांहून अधिक क्षमतेसह उघडली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर, निर्मात्यांनी त्यांचा मोठा बजेटचे चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स एंटरटेनमेंटनेही आपला आगामी चित्रपट ’83’ चित्रपटगृहात रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे. हा ’83’ चित्रपट होळीला प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
रिलायन्स एंटरटेनमेंट 83 हा चित्रपट 1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या कहाणीवर आधारित आहे. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. 83 चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने माजी भारतीय क्रिकेट कपिल देव म्हणूनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कपिल देवच्या पत्नीची भूमिका दीपिका पादुकोण साकारत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात इतरही मोठे चेहेरे दिसणार आहेत.