राज्यातील ७ व देशभरातील हे ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा संरक्षण विभागाचा निर्णय

22

सध्या पुण्यासहित देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती खूपच नाजूक असून लॉकडाऊन,करोना, व देशातील एकंदर वातावरण पाहता निवडणूक घेणे प्रशासनाला परवडणारे नसल्याने द्विसदस्यीय किंवा लोकांतील प्रतिनिधींद्वारे त्रिसदस्यीय समिती स्थापन होण्याची दाट शक्यता आहे. 

पुणे ,खडकी, देहूरोड सहित राज्यातील ७ व देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ११ तारखेपासून होईल. या आदेशाला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दुजोरा दिला आहे.

हे सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड १० फेब्रुवारी २०१५ ला अस्तित्वात आले होते. १० फेब्रुवारी २०२९ला त्यांचा कार्यकाळ संपला. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यात ६ महिन्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याची तरतूद आहे, त्यामुळे सहा -सहा महिन्यांचा दोन मुदतवाढ मिळाल्या होत्या.

संरक्षण विभागाच्या प्रधान निर्देशकांनी याबाबतचे पत्र देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंटच्या मुख्यकार्यकरी अधिकाऱ्यांना पाठवले आहे.मुदत येत्या १० तारखेला संपत असून बोर्ड बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता अधिकृत पत्र रक्षा संपदा विभागाकडून प्राप्त झाल्याने येत्या ११ फेब्रुवारीपासून बोर्ड बरखास्त होणार आहे.