परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना तात्काळ हटवून परभणी जिल्ह्याकरिता सक्षम अशा पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
पालकमंत्री मलिक हे राज्य मंत्रीमंडळातील मोठे नेते आहेत. त्यांच्यावरच पक्षासह अन्य जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच अन्य मोठ-मोठ्या जबाबदार्या आहेत, त्यामुळे ते परभणी जिल्ह्यास पुरेसा वेळ देवू शकत नाहीत, हे सिध्द झाले आहेत.
त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यास पूर्णवेळ देईल असा सक्षम पालकमंत्री द्यावा, अशी अपेक्षा प्रहरचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी या निवेदनातून केली आहे.
गेल्या वर्षभरापासून पालकमंत्री मलिक यांचे या जिल्ह्याकडे फारसे लक्ष नाही. दोन दिवसांपूर्वीचाही मलिक यांचा दौरा तीन महिन्यानंतर झाला. असे स्पष्ट करीत बोधने यांनी या आपत्तीच्या काळात ऑक्सीजन, इंजेक्शन, बेडव वगेैरे गोष्टींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा, स्थानिक पातळीवरील असमन्वय वगैरे गोष्टी प्रकर्षाने जाणवत असतांना पालकमंत्री मलिक हे पूर्णवेळ देवून या गोष्टीकडे लक्ष देवू शकत नाहीत, अशी स्थिती आहे, असेही बोधने यांनी निवेदनात नमूद केले आहे.