‘दिल्लीतील शेतकरी आंदोलन दलालांचे’ : सदाभाऊ खोत

24

दिल्लीचा बॉर्डरवर चाललेलं शेतकऱ्यांचा आंदोलन हे शेतकर्‍यांचे नसून पंजाब हरियाणा मधील दलाल आणि व्यापाऱ्यांच, आणि राजकारण्यांच आहे. असा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला आहे. आज रयत क्रांती संघटनेतर्फे मुंबईतील आझाद मैदानावर कृषी कायद्याच्या समर्थनार्थ एल्गार मोर्चा सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यावेळी ‘लुटारूंच्या टोळ्या ठेवूया, चला कृषी विधेयकाला समर्थन देऊया’ अशी हाक देण्यात येणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने हे कृषी विधेयक लागू करावेत अशी मागणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश असलेल्या राज्यांमध्ये तांदूळ आणि गव्हाची खरेदी हमी भावाने होते. ती खरेदी ९० टक्के होते. त्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पैसे दिले जातात. आणि राज्य सरकार हे पैसे बाजार समित्यांना देऊन त्यावर १३ टक्के बोनस देते.

केंद्राने तीन विधेयके संमत केली असून, विरोधकांकडून भीती घातली जात आहे. यापूर्वी खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात नव्हते. आता ग्राह्य धरून त्यासाठी लवाद नेमला आहे. त्यामुळे बाजार समित्यांचेही अस्तित्व अबाधित राहणार आहे. बाजार समितीच्याबाहेर विक्री शक्य आहे. मात्र, एक दुकान किती वर्षे चालवायचे? शेतकऱ्यांचा जन्म बाजार समित्यांमधील व्यापारी बांडगुळ पोसण्यासाठी झाला आहे का? यापूर्वी ७० वर्षे शेतकरी का सक्षम झाला नाही? असे प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, नाशिक जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे, उपजिल्हाध्यक्ष डोंगर पगार, आदी उपस्थित होते.