पुन्हा पेटणार दिल्ली शेतकरी आंदोलन

6

पंजाबात सध्या पिकांच्या काढणीचा /कापणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आपापल्या शेतात कामाला गेले असल्यामुळे दिल्ली सीमेवरच्या आंदोलक शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं. 

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यां विरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांनी  दिल्लीच्या सीमेवर काही महिने ठाण मांडलं आहे.शेतकरी गटांनी आता राज्याच्या विविध भागांमध्ये ‘फिर दिल्ली चलो’ अशी घोषणा करून आंदोलकांची संख्या वाढवायचं ठरवलं आहे.

‘आता कापणीचा हंगाम संपत आला असल्यामुळे ‘फिर दिल्ली चलो’ या मोर्चाने शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनस्थळी आणलं जाईल,’ असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

या आंदोलनात सहभागी असलेल्या बीकेयू (उग्रहण) या शेतकरी गटाने आपल्या सदस्यांना 21 एप्रिलपासून टिकरी बॉर्डरवर जमण्यास सांगितलं आहे.