दिल्ली सरकारने ऑक्सिजन रिफिलर्स नेमकी काय स्थिती आहे याची माहिती सरकारला देत नसल्याचं उच्च न्यायालयाला सांगितलं. राजधानी दिल्लीमधील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचं संकट निर्माण झाल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र तसंच राज्य सरकारला फटकारलं आहे.
तुम्ही प्रस्थापित पुरवठा साखळीला ग्राह्य धरत नसल्याचं दिसत आहे. ते दिल्लीला पुरवठा करत होते. आदेश दिलेले असतानाही टँकर का अडवण्यात आले?,” अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी केली.
आम्ही हे समजण्यात अपयशी ठरलो आहोत. आम्ही आपणास पुनर्निर्मितीच्या वाटपावर विचार करण्यास सांगितलं होतं. पण यातील काहीच झालं नाही. २१ लोकांनी आपला जीव गमावला आहे,” अशा शब्दांत फटकारलं.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी दिल्ली सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांना याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली जाऊ शकते असं सांगितलं.