देशात सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन तुटवडा आहे. ऑक्सीजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्याच अनुषंगाने दिल्ली उच्च न्यायलयाने ऑक्सिजन पुरवठ्यावरुन ‘आता आमच्या डोक्यावरुन पाणी चाललंय, असं म्हणत केंद्रातील मोदी सरकारला चांगलंच खडसावल आहे.
‘आता पाणी डोक्यावरून गेले आहे. तत्काळ अंमलबजावणी हवी आहे. तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करणार आहात. काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवा’ असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला दिले आहेत.
“आमच्या डोक्यावरुन पाणी गेलंय. आता आम्हाला कृती हवी आहे. तुम्हाला सर्व गोष्टींची व्यवस्था करावी लागेल. तुम्ही तरतूद केलीय, तर तुम्हाला ती पूर्ण करावी लागेल,” असं मत न्यायालयाने व्यक्त केलं. तसेच न्यायालयाच्या आदेशांचं पालन न झाल्यास न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कारवाई करण्याचाही इशारा सरकारला दिलाय.
दिल्ली हे औद्योगिक राज्य नसल्याने प्राथमिक स्वरूपाचा ऑक्सीजन साठाही सध्या दिल्लीत उपलब्ध नाही. त्यामुळे याची जबाबदारी ही केंद्र सरकारची असल्याचा निर्वाळा दिल्ली कोर्टाने दिला. तसेच स्पष्ट शब्दात केंद्र सरकारला खडसावले आहे.