आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. जो संघ आजचा सामना जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करून, अंतिम सामना मुंबई विरूद्ध खेळणार आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफ फेरीसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या चार टीम पात्र ठरल्या होत्या.
मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर पराभूत झालेल्या दिल्ली कॅपिटल्सला नियमाप्रमाणे क्वालिफायर टू मॅच खेळण्याची संधी मिळाली आहे. आज अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर क्वालिफायर टू मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. आजचा सामना जिंकणारी टीम फायनलमध्ये मुंबई विरुद्ध खेळेल तर पराभूत टीमचे आयपीएलमधील आव्हान संपनार आहे. या सामन्यात हैदराबाद संघ दिल्लीपेक्षा मजबूत असल्याचं दिसतंय.