पुन्हा राजेशाही, हिंदुराष्ट्र प्रस्थापित करण्याची मागणी; ‘ह्या’ देशात होतायेत आंदोलनं

11

भारताचा शेजारी असलेला छोटा शान नेपाळ देशात राजेशाही आणि हिंदुराष्ट्र प्रस्थापित करण्याची मागणी होत आहे. यासाठी अनेक संघटनांकडून आंदोलन केली जात आहेत. गेल्या दहा दिवसांपासून हे आंदोलन होत आहेत. अनेक मोठ्या शहरातील रस्त्यांवर राजेशाही आणि हिंदु राष्ट्रासाठी लोक उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

बारा वर्षांपूर्वी नेपाळमध्ये लोकशाही अस्तित्वात आली होती. मात्र सामान्य लोक नेपाळमधील लोकशाही वर नाराज असल्याचं म्हटलं जातं. नेपाळमधील राजकारणात सामान्य माणूस भरडला जात असून यापेक्षा राजेशाही चांगली होती. असं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे.

विश्व हिंदू महासंघ, शैव सेना नेपाल, राष्ट्रीय सरोकार मंच, गोरक्षनाथ नेपाल, राष्ट्रीय शक्ती नेपाल, इत्यादी संघटना आंदोलनात सहभागी होत आहेत. सोबतच अनेक सामान्य नागरिकांनी सुद्धा राजेशाही आणि हिंदुराष्ट्र स्थापण्याची मागणी केली आहे. सरकारकडून ही आंदोलनं दाबण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात असल्याचं आंदोलकांच म्हणणं आहे.