कोरोनातपासणी नंतर अहवाल येईपर्यंत रुग्णांना घरी न जाऊ देण्याची बारामतीत मागणी

4

कोरोनाची तपासणी केल्यानंतर अहवाल येईपर्यंत संबंधित व्यक्तीला बाहेरच पडू दिले गेले नाही तर वेगाने होणारा संसर्ग थोपविण्यात काही प्रमाणात तरी यश मिळेल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांना वाटतो आहे. त्यामुळे त्याचा तपासणीनंतर अहवाल येइपर्यंत घरी न जाऊ देण्याची मागणी बारामतीतून केली जात आहे.

कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतरही घरीच राहायच की दवाखान्यात जायच, एचआरसीटी, एक्सरे, इतर तपासण्या कोठे करायच्या या चर्चेतही वेळ निघून जातो.

कोरोना तपासणी झाल्यानंतर जो पर्यंत अहवाल निगेटीव्ह येत नाही, तो पर्यंत तपासणी झालेल्या प्रत्येकाला विलगीकरणातच ठेवणे आता अनिवार्य बनत आहे. 

निगेटीव्ह आल्यानंतरही त्यांनी किमान चार दिवस गृहविलगीकरणात राहायला हवे व पॉझिटीव्ह रुग्णांना थेट गरजेनुसार रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटरमध्ये पाठविणे गरजेचे आहे. असे मत बारामती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी व्यक्त केले आहे.