क्लास वन अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडीओ काढून 3 कोटी खंडणीची मागणी; अहमदनगरमध्ये हनी ट्रॅप

64

एक हनी ट्रॅपची घटना अहमदनगर येथे उघडकीस उघडकीस आली आहे. क्लास वन अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ तयार करत खंडणी मागण्याचा प्रकार अहमदनगर येथे घडला. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ माजली आहे.

हनी ट्रॅपमध्ये एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला अडकवून
3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला गेला आहे. सदरील गुन्ह्यात पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगरच्या जखणगाव येथे बध्या अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडीओ तयार केला गेला. आणि त्या अधिकाऱ्याकडून तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली. सदरील प्रकरण उघडकीस आलं आहे.

या प्रकरणात अहमदनगर तालुका पोलिस ठाण्यात एक महिला आणि 4 पुरुष अशा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील महिलेने अशा काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून हनी ट्रॅपमध्ये अडकवत खंडणी वसुली केल्याची शक्यता वर्तवली जातेय.