बारावी व दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून होणार आहेत. दर वर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा कोविडमुळे एप्रिल-मेमध्ये होत आहेत.
पत्र्याच्या खोलीत प्रचंड उकाड्याने विद्यार्थी घामाघूम होतात. दरम्यान, अजून पंधरा दिवसांनी प्रचंड उष्णता बघता वेळ सकाळ सत्रात ठेवण्याची गरज आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या नंबर गुणांवर होऊ शकतो.
राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान ४० अंशापेक्षा जास्त असते. प्रचंड उकाड्यात पेपर लिहिताना शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त आहे.
बारावी, दहावीच्या परीक्षांच्या पेपरची वेळ बदलणेबाबत शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र दिल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्यकार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांना दिली.