पंढरपुर पोटनिवडणुक आता संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरते आहे. सत्तेतील महाविकासआघाडी आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत असल्यामुळे दोघांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची होते आहे. परिणामी दोन्ही पक्षांतील अनेक दिग्गज नेते पंढरपुरात सभा गाजवत आहेत.
अशांतच भाजपचे ऊमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ विधानपरोशदेचे विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखलझाले होते. यावेळी त्यांनी सत्ताधार्यांवर टीकास्त्र सोडले. कोरोना रुग्णसंख्या रोखण्यात अपयश आल्यामुळे सरकार सातत्याने लॉकडाऊनची भाषा करते आहे. त्यामुळे महाराष्ट्रा लोकशाही लॉकशाही असल्याचे ते यावेळी म्हणाले.
महाविकासआघाडीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेत्यांनी याठिकाणी हजारी लावल्या आहेत. भाजपकडूनसुद्धा अाता स्टार प्रचाराकांना ईथे ऊतरवण्यात येत आहे.
दरम्यान या प्रचारसंभांमधून कोरोनाच्या नियमावलींना वेशीवर टंगण्याचा प्रकार घडतो आहे. ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला तुफान गर्दी जमली होती. भाजोने यावरुन टीकासुद्धा केली होती. मात्र तेच चित्र पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या सभेलासुद्धा बघायला मिळाले.