लोकशाही संपली असे जाहीर करा अन्यथा चंद्रकांत पाटील माफी मग – नवाब मलिक

41


मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल असे विधान करत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार माध्यमांसमोर भुजबळांना धमकी दिली होती. या विधानानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले होते. आता या विधानावर राष्ट्र्वादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.


न्यायालयदेखील चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असतील तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांतदादा पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी,” अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात असं म्हणत इशारा दिला होता. यावर नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.


पुढे ते म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी,” अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. “आजपर्यंत भाजपकडून संस्थांचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झालं आहे. आता न्यायालयसुद्धा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का?,” असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.