पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या आघाडीच्या वाटेला केवळ एक जागा आल्याचं राज्यातील विधानसभा निकालानंतर स्पष्ट झालं आहे.अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली.
पश्चिम बंगालच्या जनतेनं तिसऱ्या आघाडीला पूर्णपणे नाकारल्याचं यावरुनच लक्षात येत आहे की, तिसऱ्या आघाडीने उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी ८५ टक्के उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.
विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतलेल्या ठिकाणच्या त्यांच्या उमेदवरांचे तर डिपॉझिटही जप्त झाल्याचं समोर आलं आहे, यावरू भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
लौकिक आणि परफॉर्मन्स कायम राखल्याबद्दल राहुलजींचे अभिनंदन.पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमधील काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त.” असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.