उपमुख्यमंत्री अजित पवार खेळले क्रिकेट

10

राजकारणाच्या मैदानात नेहमी आपल्या वक्तव्यामुळे समोरच्याची क्लीन बोल्ड करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. बारामतीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेटच्या मैदानात सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेट सामन्याच्या ठिकाणी भेट दिली.

यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांना क्रिकेट खेळा असा आग्रह केल्यानंतर त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. यावेळी सुरुवातीचा बॉल त्यांना मारता आला नाही मात्र नंतरच्या बॉल मारल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मध्ये त्यांना दाद दिली आहे. उचलून मारा असं म्हणत कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या नावांनी एकच घोषणाबाजी केली. मग काय, अजितदादांनीही मोठ्या उत्साहाने आलेला बॉल चांगलाच टोला लगावला.