उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना इशारा म्हणाले…..

22

पु्ण्यात अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यामुळे पुण्यात पुन्हा गर्दी होत असल्याचं दिसत आहे.

त्यावेळी गर्दी झाली तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे, त्याबद्दल लक्ष द्यावे. अन्यथा आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका.असेही ते म्हणाले आहेत.

आगामी महापालिकेत प्रभाग २, ३ की ४ करिता अनुकूल आहात का, त्यावर ते म्हणाले की, ‘सध्याच्या स्थितीला मी तरी २ करिता अनुकूल आहे,’ अशी माहिती पवार यांनी दिली.

जर गर्दी वाढत राहिली, तर एका बाजूची आज आणि दुसर्‍या बाजूची उद्या अशा पद्धतीने दुकाने सुरू करण्याची वेळ आणू नका. त्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. बाहेर पडताना, नियमांचे पालन करावं,’ असे आवाहन अजित पवार यांनी केले.