राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्यास सुरुवात झाली आहे. यासोबतच ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही यासबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.
पुणेकर गर्दी करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. कडक लॉकडाऊनची वेळ येऊ नये. मात्र, नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर नाईलाजास्तव कडक लॉकडाऊन लावण्यात येईल. असे पवार म्हणाले.
कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेण्यात येत असते त्याप्रमाणे आज बैठक पार पडली. ही बैठक जवळपास तीन तास सुरू होती.पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्या संदर्भातही बैठकीत चर्चा झाली.
पुणे, पिंपरी-चिंचवडे महापौर, आरोग्य अधिकारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना कडक लॉकडाऊन लावण्याच्या संदर्भात एक इशाराच दिला आहे.