महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती असली तरी पंतप्रधान मोदी आणीबाणी लावणार नाहीत

11

महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती असली तरी पंतप्रधान मोदी आणीबाणी लावणार नाहीत. मात्र, राज्य सरकारने राजकारण बंद करून केंद्राला सहकार्य करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

आरोग्य आणि आर्थिक संदर्भातील ही आणीबाणी केंद्र सरकारने महाराष्ट्रात लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

आज परिस्थिती अशी आहे, की ज्यांची ओळख आहे त्यांचेच जीव वाचत आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांचेच जीव वाचतात. आता ग्रामीण भागात कोरोना शिरलाय. मात्र, राज्याकडून त्यांना सुविधा पुरविल्या जात नाहीत, असाही आरोप आशिष देशमुख यांनी केला.

आशिष देशमुखांनी राज्यात आर्थिक आणि आरोग्य आणीबाणी लावण्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मागणी केली. त्यावरच फडणवीस बोलत होते.