संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची झाली गळाभेट….महाराष्ट्रात खळबळ

55

महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. भाजप हा मोठा पक्ष ठरुनही विरोधी पक्ष बाकावर बसला आहे. कधीकाळी घनिष्ठ संबंध असलेले शिवसेना आणि भाजप मधुन आता विस्तव सुद्धा जात नाही. महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत यांना मानलं जातं.

त्यांच्या प्रयत्न मुळे तीन वेगवेगळ्या विचार धारेचे पक्ष आज सत्तेत आहेत. मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असं बोलणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेता पदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय तेढ हे आता रोजचे झाले आहेत.

पण काल मात्र अवघ्या महाराष्ट्राला वेगळेच काहीतरी बघायला मिळाले शिवसेनेचे संजय राऊत आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस चक्क गळाभेट घेताना दिसले, आणि अवघ्या महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले यात काहीच नव्हतं विरोधी पक्ष नेते विरोधी विरोधी बाकावर बसून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकमेकांना गळाभेट देतात यामागे कारणही तसंच गोड आहे.

झालं असं की शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कन्येचा काल साखरपुडा झाला या निमित्ताने या मंगल वेळी महाराष्ट्रातील सर्वच बडे मातब्बर राजकारणी एकाच मंडपात बघायला मिळाले शरद पवारांपासून ते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस पर्यंत सर्वच नेते यावेळी आपले राजकीय वैर बाजूला ठेवून राऊत कन्या उर्वशी हिला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले होते संजय राऊत यांची कन्या उर्वशी राऊत यांचा आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा काल मुंबई मध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडला.

यावेळी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची विशेष उपस्थिती दिसली

यावेळी फोटो शूट करताना आपल्या कन्येला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाऊन संजय राऊत यांनी चक्की गळा भेट घेतली. एकेमेकांकडे स्मित हास्य करत या गोड क्षणी वातावरणात आणखीन गोडवा भरला. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्मित करत संजय राऊत यांना प्रतिसाद दिला.

या वेळी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुद्धा हलकासा गोड सवांद होताना दिसला.

राजकीय आखाड्यात एकमेकांना दंड थोपटणारे राजकीय नेते हे एकमेकांच्या सुखात मात्र गोड शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून येतात ही महाराष्ट्राची परंपरा अवघ्या देशाने पहिली.

आकर्षण निमंत्रण पत्रिकेचे

राऊत यांनी कन्येच्या साखरपुडा निमित्त छापलेली निमंत्रण पत्रिका ही आकर्षणाचा विषय बनली होती खास गुलाबी रंगाची ही निमंत्रण पत्रिका अधिकच उठावदार दिसत होती उर्वशी यांच्या नावातील अध्यक्ष वर असलेली पी आणि मल्हार यांच्या नावातील एम हे अध्यक्ष घेऊन पीएम असा ठळक उल्लेख या निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला होता त्यामुळे निमंत्रण पत्रिका उघडतात पीएम ही अक्षरे सर्वात आधी लक्ष वेधून घेतात.

त्यानंतर खाली पुर्वशी आणि मल्हार यांचे स्पष्ट नावे दिसतात निमंत्रण पत्रिका मध्ये विशेष अशी डिझाईन करण्यात आली आहे साखरपुडा स्पष्ट उल्लेख आणि तारीख यांची माहिती लिहिण्यात आली होती निमंत्रण पत्रिकेमध्ये संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत, संदीप राऊत, सविता राऊत आणि संपूर्ण परिवाराचे नाव छापण्यात आले होते.

जुने मित्र जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांना गळाभेट देणारच – चंद्रकांत पाटील

राजकीय वैर असले तरी सुद्धा वयक्तिक संबंध कधी बिघडत नसतात. जेव्हा जुने मित्र कधी कुठे आपल्याला भेटतील जरी त्यांचे राजकीय विचार वेगळे असतील तरी सुद्धा आपण त्यांना मिठी मारणारच हे स्वाभाविक आहे. यात वेगळे असे काही घडले नाही. आनंदाच्या वेळी आपला दुष्मन जरी असला तरी सुद्धा त्याला शुभेच्छा देणं ही आपल्या देशाची संस्कृती आहे. अशी प्रतिक्रिया या बाबत चंद्रकांत पाटील यांनी दिली.