‘देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत; यावर न्यायालयांनी शिक्कामोर्तब केलंय’

70

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, मोदी सरकारने राज्यांना भरभरून रेमडेसीवर, ऑक्सीजन व वैद्यकीय मदत पुरवली असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत. यावर सर्वोच्च न्यायालय आणि देशातील अनेक उच्च न्यायालयांनी शिक्कामोर्तब केले आहे. अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्राची रोजची ऑक्सीजनची गरज १७५० मे. टन आहे. यातील १२०० मे टन महाराष्ट्रात निर्माण केला जातो यात मोदी सरकारचे काही योगदान नाही. ५५० मे टन अधिकचा ऑक्सिजन हवा होता तेही मोदी सरकार पुरवू शकत नाही ही वस्तुस्थिती असल्याचं पटोले म्हणाले.

देशातील जनता रेमडेसीवीर मागत असताना भाजपाचे नेते रेमडेसीवीरचा काळाबाजार करण्यात व्यस्त होते. स्वतः देवेंद्र फडणवीसही एका काळाबाजार करणा-या कंपनीच्या लोकांना वाचविण्यासाठी मध्यरात्री पोलीस स्टेशनला जाऊन गोंधळ घालत होते.

रेमडेसिवीर साठेबाजीप्रकरणी अहमदनगरच्या भाजप खासदाराविरोधात कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. याची आठवण सुद्धा पटोले यांनी करून दिली.