प्रवीण दरेकर यांच्या लेखाजोखा या पुस्तकाचं प्रकाशन आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.त्यावेळी आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत. त्यांना आता सुदर्शन चक्र काढावंच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातच काढा, अशा शब्दात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे.
याच कार्यक्रमात बोलताना प्रवीण दरेकर यांनीही फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली. देवेंद्र फडणवीस हे अजूनही वस्तादच आहेत. ते आजही सगळ्यांशी एकटेच लढत आहेत, अशा शब्दात दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. ज्या झाडाला फळ त्यालाच दगड मारतात, जिथे फळ नाही तिथे कोणी जात नाही, असंही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची उपस्थिती होती.
जंगलात वादळ आल होत तेव्हा जंगलातले वाघ बिळात बसले होते, तेव्हा प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीस सगळीकडे वादळाचा सामना करत फिरत होते, असा टोला दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.