कोरोनामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी काय उपाय करता येतील यावर दीपक पारेख यांच्या समितीने काही उपाय, शिफारशी सांगितल्या होत्या. त्यातील सोयीच्या अशा काहीच शिफारशी लागू करण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केला. महत्वाचे म्हणजे मुद्दामहून इंग्रजीत पत्र लिहीत असल्याचेही ते म्हणाले आहेत.
राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसणार असून निवडक लोकांनाच याचा फायदा व्हावा या पद्धीतीचे काम काही लोक करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी पत्रात केली आहे.राज्य सरकार दररोज आपल्या आर्थिक स्थितीबाबत चिंता करीत असताना राज्याच्या तिजोरीची अशी उघड लूट आपण होऊ देणार नाही. यामुळे यावर लगेचच उपाययोजना कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे फडणवीस म्हणाले.
बांधकाम क्षेत्रात मागणी वाढावी, यासाठीच्या सुधारणांविरोधात आपण नाही. पण, त्या नावाखाली सत्तेचा अमर्याद दुरूपयोग होता कामा नये, म्हणूनच हे पत्र मुद्दाम इंग्रजीत लिहित आहे. यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर आम्हाला उच्च न्यायालायात जनहित याचिका दाखल करावी लागेल. याबाबतची माहिती तुम्ही मला कधीही विचारू शकता असेही फडणवीस म्हणाले.