गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या आत ही समिती अहवाल सादर करणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर प्रश्न निर्माण करत आहेत. म्हणजे सदरील समितीत असलेल्या न्यायाधीश महोदयांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
याआधी नवी मुंबईतील भतीजाच्या एका ३०० कोटीच्या जमीन व्यवहारप्रकरणी जेव्हा देवेंद्रजींच्या खात्यावर आरोप होत होते तेव्हा याप्रकारची समिती त्यांनी गठीत केली होती. अशी आठवण सुद्धा मलिक यांनी फडणवीसांना करून दिली आहे.
त्यामुळे आता त्यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही. फडणवीस यांची ही दुतोंडी भाषा योग्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.