धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं होतं. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुंडे अडचणीत आले असतानाच, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. खेडेकर यांनी पोस्ट लिहून मुंडे हेच योग्य असल्याचं निर्वाळा दिलाय. मुंडे यांनी स्वतः फेसबुकवर या आरोपांना सविस्तर उत्तर दिले. त्यांचे स्पष्टीकरण, त्यातील स्पष्टता, सहजता व जबाबदारी समजून वागणूक हे सर्व ऐकून मला मुंडे यांच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे. त्यांनी दिलेल्या जाहीर स्पष्टीकरणाबद्दल मी मुंडे यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी सामाजिक कार्यकर्ते या नात्याने खंबीरपणे उभे राहणार असल्याचे जाहीर करतो. असे खेडेकर म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी अशा विवाहबाह्य संबंधांना लपवून ठेवले नाही. मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाबाबत कुटुंब व विशेषतः बायकोपासून हे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. ही बाब उमदेपणाची किंवा अलंकारिक अर्थाने घ्यावयाचे म्हटल्यास मर्दपणाची आहे. विवाहबाह्य नात्यांना नैतिक उंची व समाजमान्यता देणारी आहे, अशा शब्दांत खेडेकरांनी मुंडेंना पाठिंबा दिला आहे