प्रीतम मुंडेंना धनंजय मुंडेंचा काळजीयुक्त संदेश म्हणाले ….

97

भाजप खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी शनिवारी संध्याकाळी प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. 

प्रीतम मुंडे यांच्या व्हिडिओतील माहितीचा bnnnnसंदर्भ धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिला आहे. काही लक्षणे आढळल्यामुळे बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे या उपचार घेत असल्याचे समजले. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. 

प्रभू वैद्यनाथ कृपेने आपण लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो, असं आपल्या ट्वीटमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भावाच्या सदिच्छांना प्रतिसाद देत “धन्यवाद!” अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये देखील या दोन कुटुंबांमधील आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले आहेत. पण, त्यापलिकडे जाऊन या बहीण-भावंडांमध्ये असलेले नाते देखील काही वेळी समोर आलेले आहे.