राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठांना श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमासाठी मुंडे शहरात आले होते. त्यानंतर ते मिडियाशी बोलत होते. एखाद्या व्यक्तीपर्यंत जाता येत नसेल,तर त्याच्या सहकाऱ्यापर्यंत जायचं आणि ईडीचा वापर करायचा, हे अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, हीच ईडी एक दिवस भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वाक्य लिहून ठेवा, असा इशारा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये भोसरीत दिला.
ईडीने कारवाई सुरु केलेले ठाणे येथील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला.शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) २४ नोव्हेंबर रोजी छापा टाकला होता. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांनवर कोणतीही कारवाई न करण्याचे सुप्रीम आदेश सर्वोच्च न्यायालयाने ED ला दिले आहेत.
त्यावर मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी कन्विन्सिंग होत नाही, तेंव्हा भाजप कनफ्यूज करतं,असा हल्लाबोल त्यांनी दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलन व त्याविषयी भाजपच्या अप्रचारावर केला. तेव्हा ते म्हणाले,शेतकऱ्यांना फसवणारेच नाहीत, तर संपवणारे आहेत. त्यामुळे शेतकरी संपला,तर देशही संपणार आहे.जनतेच्या फायद्याच्या योजना आणणे हीच खरी आमच्या नेतृत्वाला (पवारसाहेबांना) वाढदिवसाची भेट असणार आहे, असेही ते म्हणाले.