‘राजकीय दबाव टाकून धनंजय मुंडेंवर आरोप करायला लावले”

302

राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र, आता त्यांना सदरील प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव आपण तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी सांगितलं.

रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे अरोपामुळे त्रस्त झाले होते. मात्र आता रेणू शर्मा या तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजकीय दबावातून तक्रार करायला लावली होती, अशा पद्धतीचं वक्तव्य पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी केल्याचा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. तसेच हे प्रकरण संपलेलं आहे.

राजकारणाची पोळी भाजण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले होते, त्याबाबतही रेणू शर्मा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.