‘विवाहबाह्य संबंधात धनंजय मुंडे बिनविरोध विजयी; मंत्र्यांच्या विरोधात महिला तक्रार करायला घाबरतील’ : तृप्ती देसाई

360

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र, आता त्यांना सदरील प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव आपण तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी सांगितलं.

रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे अरोपामुळे त्रस्त झाले होते. मात्र आता रेणू शर्मा या तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3685808704842358&id=100002397939695

त्यावर आता समासेविका तृप्ती देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. आवाज कोणाचा? माज हा सत्तेचा,  महिलेवर दबाव आणून हाणून पाडला- राष्ट्रवादी पुन्हा. बलात्काराच्या तक्रारीत, विवाहबाह्य संबंधात धनंजय मुंडे बिनविरोध विजयी. मंत्र्यांच्या विरोधात यापुढे आता महिला तक्रार करायला घाबरतील, कारण धमक्या आणि दबाव आणून रेणू शर्माला, तिच्या वकिलांना तक्रार मागे घ्यायलाच लावली. -हेच का राष्ट्रवादीचे महिला धोरण? असा संतप्त सवाल तृप्ती देसाईंनी व्यक्त केला आहे.