औरंगाबादेत धनंजय मुंडेंना डच्चू; जबाबदारी राजेश टोपेंच्या खांद्यावर

16

औरंगाबाद महानगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याच्या हेतूने औरंगाबादला संपर्कमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढे येणाऱ्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला यश खेचून आणण्याची कामगिरी करण्यासाठी
राजेश टोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

औरंगाबादचे संपर्कमंत्री म्हणून याआधी धनंजय मुंडे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि बरेच महिने निघून गेले. त्यामुळे त्यांना संपर्कमंत्री म्हणून शहरासाठी वेळच देता आला नाही. त्यामुळे आता त्यांच्याजागी राजेश टोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी महापालिका व ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर हा खांदेपालट महत्वाचा आहे. संपर्कमंत्री म्हणून टोपे यांनी महिन्यातून किमान एक बैठक घेऊन त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवावा, असे देखील नियुक्ती पत्रात म्हटले आहे. आता राजेश टोपे औरंगाबादेत राष्ट्रवादी पक्षाला किती यश मिळवून देऊ शकतात हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.