धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा होणार आमदार; ‘या’साठी घेतली मुंबईच्या महापौरांची भेट

88

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे यांनी आपण राजकारणात येत असल्याचे संकेत दिले आहेत. करुणा मुंडे यांनी महापालिकेत जाऊन ‘पी’ उत्तर विभागातील स्वच्छतागृह आणि स्वच्छतेच्या प्रश्नी महापौरांकडे निवेदन दिले. या वेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी त्या म्हणाल्या की, पी उत्तर विभागात 18 वॉर्ड असून, एकच स्वच्छता अधिकारी आहे. कोरोना काळात स्वच्छतेवर जास्त लक्ष द्यायला हवे. नरेंद्र मोदींचा नारा आहे की, स्वच्छ भारत अभियान. परंतु, असे काही इथे दिसत नाही.

आम्ही जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. राजकारणात यायच्या आधी मला चांगली समाजसेविका व्हायचे आहे. मला आमदार व्हायला आवडेल असेही त्या म्हणाल्या.

२५ वर्ष मी कधीही घराबाहेर पडले नव्हते. गेल्या २ महिन्यांपासून मी घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. मी माध्यमांसमोर अशी येईन असे मला वाटलेही नव्हते. पूजा चव्हाणसह अन्याय झालेल्या इतर मुलींना मी न्याय मिळवून देणार आहे. महिलांची स्थिती वाईट आहे. माझ्यासोबत काय झाले ते पाहता मीसुद्धा आत्महत्या कऱणार होते. पण मी विचार केला की, इतरांसाठी लढेन. असंही त्यांनी म्हटलं आहे.