शुक्रवारी (दि.27 ऑक्टोम्बर) बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुरुडी या गावातील १० वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेले होते . त्यात या मुलांचा मृत्यू झाला होता त्यानंतर आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली.
तसेच पीडित कुटुंबाला वनविभागकडून ५ लाखांचा धनादेश दिला आणि १० लाख रुपयांचा त्यांच्या मुलांच्या नावे एफडी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले त्याचबरोबर या कुटुंबांचे पालकत्व ही धनंजय मुडेंनी स्वीकारले आहे.
गावकऱ्यांशी संवाद साधताना जुन्नर, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, आदी ठिकाणाहून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा आणखी कुमक मागविण्यात येणार आहे. तसेच पुढच्या तीन दिवसात बिबट्याला पकडण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.