धोनीने अव्वल क्रमांकावर खेळायला यायला हवे : गौतम गंभीर

16

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज हे संघ आज मुंबईत आयपीएल 2021चा आठवा सामना खेळणार आहेत.

भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सल्ला दिला आहे. धोनीने सातव्या क्रमांकावर खेळण्याऐवजी अव्वल क्रमात खेळायला यायला हवे, असे गंभीर म्हणाला.

धोनीने फलंदाजांच्या वरच्या फळीत येऊन खेळले पाहिजे, कारण पुढाकार घेऊन नेतृत्व करणे महत्वाचे आहे. एका लीडरला पुढे येऊन नेतृत्व करावे लागते. तुम्ही जर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असाल, तर तुम्ही नेतृत्व करू शकणार नाही.असेही गंभीर म्हणाला.