हुकूमशहा किम जोंग उनच्या क्रूरतेचा कळस; कोरोनाचे नियम मोडणाऱ्यावर झाडल्या गोळ्या

10

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा त्याच्या क्रूरतेसाठी लोकप्रिय आहे. त्याचा क्रूर चेहरा हा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान उत्तर कोरियामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन करणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेले नियम मोडले म्हणून  एका व्यक्तीला सर्वांसमोर गोळी घालण्यात आली आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांना पाहताच क्षणी गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर कोरियात हुकुमशहाच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच लोकांना घाबरवण्यासाठी उत्तर कोरियाने चीन सीमेवर अँटी एयरक्राफ्ट बंदुकाही तयार ठेवल्या असल्याची माहिती मिळत आहे.