सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा राज्यात निर्माण झाला आहे. रुग्णांना मोठ्या संकटाला सामोरे जावं लागत आहे.
त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मात्र, सामान्य नागरिकांना रेमडेसिविर इंजेक्शन कसे मिळवायचे हा प्रश्न भेडसावत आहे.
रेमडेसिवीरची साठेबाजी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील संपूर्ण भाजप का घाबरली?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या मालकाचं वकीलपत्र घेतलं होतं की त्यांचे लागेबांधे होते म्हणून त्यांची बाजू घेत होते, हे त्यांनी स्पष्ट करावं. असं सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे.